मार ओस्थाथिऑस हॉकी स्पर्धेत 14 संघ सहभागी होणार

पुणे – पहिल्या मार ओस्थाथिऑस निमंत्रित हॉकी स्पर्धेत पुण्यातील 14 संघांनी भाग घेतला असून ही स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी, नेहरूनगर-पिंपरी येथे शनिवार, 6 एप्रिल पासून सुरू होणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन मार ग्रेगोरी आर्रोथोडॉक्‍स सिरीयन चर्च, देहू रोड यांनी केले असून ही स्पर्धा मालणकरा ऑर्थोडॉक्‍स चर्चचे सिनिअर मेट्रोपोलिटन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेतली जात आहे. सात दिवस चालणारी ही स्पर्धा हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेखाली आणि डायनामिक स्पोर्टस्‌ ऍकॅडमी यांच्या संयोजनामध्ये होत आहे.

बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या संघांना फिरती ढाल देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, गोलरक्षक, रक्षक, मध्यरक्षक, आघाडीवीर तसेच सर्वाधिक गोलस्कोरर, उदयोन्मुख खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेश लांडगे, फादर जॉन मथाई, बिजू जॉजत्त, बबन वर्गिस, शर्ली पाईणकर, हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोर आणि उपाध्यक्ष मनीष आनंद यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्टॅनली डिसुझा यांची स्पर्धेचे संचालक म्हणून तर, स्पर्धेचे संयोजन सचिन श्रीधरण तांबा यांची अंपायर व्यवस्थापक म्हूणन नियुक्ती केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.