कोल्हापूर(प्रतिनिधी) – सध्या ‘कोरोना’ विषाणूंमुळे सर्वच ठिकाणी दुध विक्रीमध्ये घट झालेली आहे. त्यामुळे गोकुळ दुध संघाचीही दुध विक्री घटलेली आहे. त्यामुळे उर्वरीत दुधाची दुध पावडर करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
यामुळे 1 एप्रिल पासून गाईच्या दुध खरेदी दरामध्ये दोन रुपयांची कपात करणेचा निर्णय संघाने घेतलेला आहे. सध्या गाईच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता रुपये २९ इतका दर आहे. तो दिनांक 1 एप्रिल पासून रुपये २७ इतका करणेत येत आहे.