ब्युनॉस आयर्स – मेंदूवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर अर्जेंटिनाचा प्रख्यात माजी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. साठ वर्षीय मॅराडोना आता ब्युनॉस आयर्सच्या उत्तरेकडील तिग्रे उपनगरातील त्याच्या निवासस्थानी आला आहे.
1986 साली अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या मॅराडोनाच्या दृष्टीने सध्याचा कालखंड हा त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण असून त्यावर मात करता येईल असे मला वाटू लागले आहे.
त्याचबरोबर मद्यावर अवलंबून राहण्याची त्याची सवय सुटण्यासाठी चालू असलेले उपचार यापुढेही सुरु राहणार असल्याचे त्याचे वकील मतिस मोर्ला यांनी म्हटले आहे. मेंदूच्या विशिष्ट भागात रक्त साकळत असल्याने गेल्या आठवड्यात त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
मॅराडोनाच्या प्रकृतीवरून गेले काही दिवस त्याचे नातेवाईक, मित्र, चाहते यांच्यात सोशल मिडियावर रोज वाद-विवाद आणि भांडणे चालू आहेत. परस्परांविषयीच्या अशा नकारात्मक संदेशांमुळे आणि भांडणांमुळे मॅराडोनाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मॅराडोनाचा जन्म 30 ऑक्टोबर 1960 रोजी ब्युनॉस आयर्सजवळील लानस येथे झाला.
1980 च्या दशकात एक सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून त्याने नाव कमावले. फुटबॉलवरील त्याचे नियंत्रण आणि गोल करण्याच्या संधी साधण्याचे कसब त्यामुळे तो आजही लोकप्रिय आहे. 1986 मध्ये अर्जेंटिनाला विश्वकरंडक जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. मेक्सिको सिटी येथील अझटेका स्टेडियमवर 22 जून 1986 रोजी अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये चुरशीचा फुटबॉल सामना झाला.
फुटबॉलच्या नियमानुसार त्यावेळी बॉलला हात लागल्याने त्याला पिवळे कार्ड दाखवणे गरजेचे होते आणि तो गोल रद्द करायला हवा होता. मात्र त्यावेळी पंचांना त्याच्या हालचाली स्पष्टपणे दिसल्या नाहीत. त्याचबरोबर तोपर्यंत तिसरा पंच (व्हिडिओ असिस्टंट रेफ्री) पद्धत सुरु झालेली नव्हती.
नंतर अर्जेंटिनाने आणखी एक गोल केला आणि अर्जेंटिनाने हा सामना 2-1 असा जिंकला होता. सामान्यानंतर बोलताना मॅराडोना म्हणाला होता की, तो गोल काहीसा माझ्या डोक्याने आणि काहीसा देवाच्या हाताने (हँडस ऑफ गॉड) नोंदवला गेला. तेथून पुढे अनेक बाबतीत हा देवाचा हात सतत पुढे येत राहिला.