पुणे – पुण्यातील फुरसुंगी येथील सोनारपुल येथील एका कंपनीत शिरून पाच दरोडेखोरांनी पिस्तुलाचा आणि कोयत्याचा धाक दाखवून 1 लाख 27 हजारांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अनोळखी पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आशिष मल्हारी पवार (25, रा. भोई आळी, फुरसुंगी ता. हवेली जि. पुणे. मुळ रा. लातुर) यांनी अनोळखी दरोडेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे.
फुरसुंगी येथील दिघे वस्ती येथील सोनारपुल येथे डेक्सटल लॉजिस्टीक कंपनी आहे. त्या ठिकाणी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पवार आणि त्यांचे सहकारी पार्सल वेगवेगळे करण्याचे काम करत असताना अचानक पाच जण काही जण तोंडाला रूमाल बांधून तर काही जण माकड टोपी घातलेल्या अवस्थेत कंपनीत शिरले.