#AusOpen : पराभवानंतरही प्रजनेश आॅस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत


मेलबर्न : भारताचा टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरन याला ‘लकी लूजर’ म्हणून आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरूष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. तसेच या फेरीत त्याने पहिला सामना जिंकला तर त्याचा सामना जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेला दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच याच्याशी होऊ शकतो.

दरम्यान, पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात प्रजनेशला लॅटेव्हियाच्या अर्नेस्ट गुलबीस याने पराभूत केल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. मात्र प्रजनेशच्या नशिबाने त्याला साथ दिली. स्पर्धेत सरळ प्रवेश मिळालेल्या एका खेळाडूने माघार घेतली आणि ‘लकी लूजर’ म्हणून प्रजनेशला संधी मिळाली.

स्पर्धेत प्रजनेशचा पहिला सामना जपानच्या तात्सुमो इटो याच्याशी होणार आहे. इटो क्रमवारीत प्रजनेशपेक्षा २२ गुणांनी मागे आहे. या दोघामधील हा पहिलाच सामना आहे. प्रजनेश सलग पाचव्यांदा ग्रँडस्लॅमच्या मुख्य फेरीत खेळणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here