नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांची भारतीय तिंरदाजी संघटनेच्या (एएआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर महाराष्ट्रातील अमरावतीचे प्रमोद चांदूरकर यांची महासचिवपदी निवड करण्यात आली आहे.
आप सबों की शुभकामनाएं और आशीर्वाद से मैं आर्चरी एसोसिएशन ऑफ इंडिया का अध्यक्ष निर्वाचित हुआ।अब हमारा लक्ष्य टोक्यो ओलंपिक है।मैं एसोसिएशन के नव निर्वाचित सदस्यों एवं आप सबों का आभार व्यक्त करता हूं। pic.twitter.com/izFv6n1YWH
— Arjun Munda (@MundaArjun) January 18, 2020
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार झालेल्या निवडणुकांमध्ये मुंडा यांनी सेवानिवृत्त सनदी अधिकारी बीव्हीपी राव यांचा ३४-१८ अशा मतांनी पराभव केला. मुंडा यांचा कार्यकाळ चार वर्षाचा असेल.
तर प्रमोद चांदुरकर यांनी महासचिवपदाच्या लढतीत चंदीगडचे महासिंग यांचा ३१-२१ असा पराभव केला. या निवडणुकीत ३१ राज्य संघटनांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यापैकी २६ जणांनी मतदान केले.