पुणे – सुपे परगाण्यांच्या अभयारण्यात हरीण मोठ्या प्रमाणात आहेत मात्र तुम्ही कुठे मारायला बिरायला जाऊ नका “नाहीतर चक्की पिसिंग अँड पिसिंग” करत बसाल, एक म्हणाला आम्ही मारत नाही पण पारधी एक कुटुंब अधुन मधून मारतंय आणि सात दिवस सुकून सुकून खातयं खरं-खोटं देव जाणे मात्र त्यांनाही योग्य सवय लावू.
पारधी समाजाच्या लोकांना सल्ला देताना अजित पवार म्हणाले की, पवार साहेब पन्नास वर्षापूर्वी एका अपत्या वर थांबले. तुम्ही एकावर नाही निदान दोनवर तरी थांबा. पवार साहेबांनी कुटुब नियोजनाचा धडा घालुन दिला आहे, एक कुटुंब एक मुल तुम्ही पण तसा विचार करा. पलटण वाढवण्याच्या भानगडीत पडू नका असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. मात्र असं म्हणताच उपस्थितीतामध्ये मोठा हशा पिकला. ते बारामती तालुक्यातील वढाणे येथील कार्यक्रमात बोलत होते.