Newasa Crime | रांजणगांव (देवी) ता. नेवासा येथे विद्युत पारेषण कंपनीचे 220 के. व्ही. विद्युत वाहिणीच्या तारा ओढण्याचे काम पोलीस बंदोबस्तात सुरु होते. यावेळी चार ते पाच जणांनी कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांना आम्हाला नुकसान भरपाई कधी देणार ? याबाबत लेखी माहिती द्या, असे म्हणत चालू असलेल्या कामाला अटकाव केला. आठ ते दहा जणांनी चालू असलेले काम बंद पाडण्यासाठी ट्रँक्टरची ट्रॉली आडवी लावून मोबदला मिळाल्याशिवाय काम चालू करु देणार नसल्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली.
नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल( Newasa Crime )-
शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात मनोरा उभारणीला तारा जोडण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी संजय बंडु ठुबे, कमलेश नवले, दत्तात्रय भाऊसाहेब पंडित सर्व (रा.सौंदाळा, ता.नेवासा) तसेच तुकाराम भानुदास पेहरे, लक्ष्मण कचरु पेहरे, रामभाऊ कचरु पेहरे, अमोल चौधरी, निलेश शिंदे (सर्व रा. रांजणगावदेवी ता.नेवासा) व इतर चार ते पाच अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत पारेषण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिपक कैलाससिंग (वय ३४ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकसान भरपाईसाठी कामात अडथळा (Newasa Crime )
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विविंड करंजीडोंगर ते भेंडा दरम्यान 220 के. व्ही. विद्युत वाहिणीचे काम सुरु आहे. सदरचे काम हे उपविभागीय दंडाधिकारी अहमदनगर यांच्या समंतीने शासनाच्या आदेशान्वये महा- पारेषाणकडून मनोरा उभारणीवर तारा ओढण्याचे काम सुरु आहे.
यावेळी राजंणगावदेवी येथे सुरु असलेल्या कामात काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे तर काही शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्यामुळे चालू असलेले काम बंद पाडण्याच्या उद्देशाने आम्हाला नुकसान भरपाई दिल्याशिवाय वाहिनीचे काम चालू देणार नसल्याची भूमिका घेवून आडदांडपणे काम बंद करण्यासाठी ट्रॉली आडवी लावून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता दिपक कैलाससिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या वाचा –
नेवासा । संत ज्ञानेश्वर मंदिरही आता महारांजाविना झाले पोरके
नेवासा: भानसहिवरे येथील शेतकरी चव्हाण यांच्या ‘को – ज्ञानेश्वर’ ऊस वाणास केंद्र सरकारची मान्यता