Stock Market Closing | सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात मोठी घसरण पाहिल्यानंतर, मंगळवारच्या ट्रेडिंग सत्राने भारतीय शेअर बाजारासाठी दिलासा दिला. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजारात जोरदार तेजी दिसून आली.
आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 483 अंकांच्या उसळीसह 71,555 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 127 अंकांच्या उसळीसह 21,743 अंकांवर बंद झाला.
बाजार भांडवलात वाढ ( Stock Market Closing ) –
आजच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 380.80 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 378.85 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते.
बॅंकिंग शेअर्समध्ये खरेदी ( Stock Market Closing ) –
आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये खरेदी दिसून आली, त्यामुळे बँक निफ्टी 620 अंकांच्या वाढीसह बंद झाला.
याशिवाय आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, प्रायव्हेट बँक, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर कमोडिटी, मीडिया, मेटलच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
आजच्या सत्रात मिड-कॅप आणि स्मॉल शेअर्समध्ये खरेदी झाली आणि दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स वाढीसह आणि 5 शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 39 शेअर्स वाढीसह आणि 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स ( Rising and falling stocks ) –
आजच्या सत्रात आयसीआयसीआय बँक 2.46 टक्के, ॲक्सिस बँक 2.30 टक्के, विप्रो 2.14 टक्के, एनटीपीसी 1.85 टक्के, कोटक महिंद्रा 1.58 टक्के वाढीसह बंद झाले. तर अल्ट्राटेक सिमेंट 1.03 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.85 टक्क्यांनी, टायटन 0.60 टक्के, टाटा मोटर्स 0.48 टक्के, आयटीसी 0.06 टक्के घसरणीसह बंद झाले.
228 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर ( Stock Market Closing ) –
BSE वर उपलब्ध तपशीलानुसार, आज 3942 समभागांचे व्यवहार झाले, त्यापैकी 1716 वाढले, 2136 घसरले आणि 90 अपरिवर्तित राहिले.
तर 228 समभागांनी 52 आठवड्यांच्या उच्चांकावर तर 68 समभागांनी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली. याशिवाय 15 शेअर्स अपर सर्किटमध्ये तर 4 शेअर्स लोअर सर्किटमध्ये आले.
इतर बातम्या वाचा –
शेतकऱ्याच्या मुलाने लाखोंची नोकरी सोडून सुरू केले स्टार्टअप; मिळवले मोठे यश
आता परदेशात फिरण्यासाठी डॉलर घ्यायची गरज नाही; ‘या’ 10 देशांमध्ये करू शकता UPI पेमेंट