नेवासा । संत ज्ञानेश्वर मंदिरही आता महारांजाविना झाले पोरके

नेवासा (राजेंद्र वाघमारे) : जगाच्या नकाशावर धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेञ नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर सध्या ‘साधू विना पोरके’ झाले असून मराठी भाषेचे उगमस्थान असणाऱ्या व जगाला ‘पसायदान’ देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये ह.भ.प.महाराजांची नेमणूक करण्याची मागणी भाविक – भक्तांकडून केली जात आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते माञ या भूमीमध्ये साधूसंतांचाही कधीकाळी छळ झाल्याचे उघड सत्यही कोणालाच नाकारुन चालता येणार नाही, जगाला पसायदान देणाऱ्या आणि ‘हे विश्वची माझे घर’ हा आपुलकीचा संदेश देणाऱ्या तिर्थक्षेञ नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरालाही आता ‘महाराज’च देवस्थानामध्ये राहिलेले नसल्यामुळे साधूविना ज्ञानेश्वर मंदिर असल्याचे दिसून येत आहे.
येथील देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प शिवाजीमहाराज देशमुख हे या मंदिराचा कारभार पहात असतांना नेवासा येथील वकिल संघाने या मंदिरातील शिवाजीमहाराज देशमुख यांच्या विरोधात जन-आक्रोश मोर्चा काढून चक्क महाराजांचीच हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानावर मोर्चा काढलेला होता त्यामुळे येथील ह.भ.प.शिवाजीमहाराज देशमुख सध्या काम पहात नसल्यामुळे ज्ञानेश्वर मंदिर आता महाराजांविना पोरके झाल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे या ज्ञानेश्वर मंदिरात महाराजांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत आता उघडपणे वारकऱ्यांतून व्यक्त केले जात आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा येथून ‘पैस’ खांबाला टेकून जगाला ‘ज्ञानेश्वरी’ या महान ग्रंथाला जन्म दिलेला असून जगात खांबासाठी मंदिर हे वैशिष्ठ्य येथील मंदिराला असून या देवस्थानचा विकास होणे तर सोडाच माञ नेवासा येथे राज्यातून येणाऱ्या भाविकांना माऊलीचरणी नतमस्तक होण्यासाठी गर्दीतून वाहनाला मार्ग काढून सोयीचा रस्ता मिळणेही मोठी मुश्किलबाब झालेली आहे.
तर आता हे मंदिरही महाराजांविना पोरके झाल्याची जनभावना भाविकभक्तांतून व्यक्त केली जात असतांना या महान तिर्थक्षेञ सध्या कारभाऱ्याविना पोरके झाल्यामुळे विश्वस्त मंडळावर भाविकभक्तांकडून तिव्र नाराजीचा सुरु निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
चौकट
संत ज्ञानेश्वर महाराजांचाही सन्याशाची मुले म्हणून एकेकाळी छळ झालेला असतांना आता भाविकांनाही महाजांविना हे मंदिर पोरके झाले असल्यामुळे हा सुद्धा एकप्रकारे भाविकांचा छळच अाहे की, काय अशा संमिश्र प्रतिक्रिया भाविक-भक्तांतून व्यक्त केल्या जात आहे.





