नवी दिल्ली : न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज राॅस टेलर भारताविरूध्दच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत सहभागी होईल तेव्हा त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदविला जाणार आहे.
हा सामना टेलरचा शंभरावा कसोटी सामना ठरणार आहे, तसेच या सामन्याव्दारे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तीनही प्रकारात प्रत्येकी शंभर सामने खेळणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरणार आहे.
भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यास येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान होणार आहे.