मंचर – पिंपळगाव (खडकी – ता. आंबेगाव) येथे महावितरण कंपनीने रोहित्र उपलब्ध करून दिल्याने वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
पिंपळगांव परिसरात निसर्ग चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी झाडे उन्मळून पडली होती, तसेच अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटून विजेचे खांब पडले होते.