बीड – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबर रोजी एक संकल्प करत असतात. यंदाही त्यांनी एक वेगळा संकल्प केला आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडियोमध्ये पंकजा मुंडे यांनी मुंडे समर्थकांना गडावर न येता ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करावी असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.
काय आहे पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट
मुंडे समर्थकांना गडावर न येता ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करावी असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे सुद्धा या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत.