वाल्हे -करोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा रुग्ण राज्यासह पुणे जिल्ह्यात आढळल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र व करोना लसीकरण केंद्रांवर लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत.
दरम्यान, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गेल्या दोन दिवसांत 953 नागरिकांचे लसीकरन झाल्याची माहिती आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी दिली.करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने, काही लोक बेफिकीर झाले होते.
तर लसीकरण करून घेण्यास निरुत्साही झाले होते. काहींनी पहीला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस वेळेत घेणे टाळले होते. असे नागरिक मागील आवड्यापासून ओमायक्रोनच्या दास्तीने लसीकरण करून घेण्यास सुरुवात केली आहे.