मुंबई – कोरोनावरील तीन लसींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु असल्याचे पंतप्रधानांनी लालकिल्यावरील आपल्या भाषणातून सांगितल आहे. कोरोनावरील लस सर्वप्रथम शोधल्याचा दावा रशियाने केलाय. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील फार्मा औषध कंपनीने करोना संपवण्यासाठी मलम उपयुक्त असल्याचा दावा केलाय.
एफडीए नोंदणीकृत असलेल्या नॉन प्रिस्क्रिप्शन ओव्हर द काऊंटर या मलमने कोरोना वायरससहित अन्य विषाणुंच्या संक्रमणापासून देखील बचाव होईल, असा दावा करण्यात आला आहे. यासोबत उपचार आणि कोरोना संक्रमण संपवण्याची क्षमता या मलममध्ये असल्याचे सांगण्यात येते आहे.
टीएक्स उपचारानंतर संक्रमण करणारा कोणता विषाणू न आल्याचे प्रयोगशाळेतील अहवालातून स्पष्ट झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हे एक महत्वपूर्ण संशोधन सिद्ध होईल.
ज्यातून नाकाच्या वाटे कोरोना वायरस आत जाण्याची शक्यता कमी होईल, असे अॅडवांस्ड पेनिट्रेशन टेक्नोलॉजीचे संस्थापक डॉ. ब्रायन ह्यूबर यांनी सांगितले.