पुणे – मौज मजेसाठी वाहन चोरणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन ऍक्टिव्हा आणि एक पल्सर ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक वाहन चोरले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वारगेट पोलिस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना, पोलिस कर्मचारी ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मिनाताई ठाकरे वसाहती जवळ दोन मुले संशयास्पदरित्या फिरत असल्याची खबर मिळाली होती.
त्यानूसार दोघांना घटनास्थळावरुन ताब्यात घेतले असता, त्यांनी वाहन चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली. त्यांच्या सखोल चौकशीत तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलिस निरीक्षक (गुन्हे )शब्बीर सय्यद,पोलिस उपनिरिक्षक जयभाई यांच्या पथकाने केली