अमेरिकेत नव्या गाईडलाइन्स; जाणून घ्या, स्पर्शातून होतो का करोना संसर्ग ?

वॉशिंग्टन – कोणत्याही गोष्टीला स्पर्श केल्यास करोना संक्रमणाचा धोका अधिक असतो. परंतु आता एका नवीन अभ्यासानुसार असा दावा केला गेला आहे की, स्पर्श करुन करोना पसरण्याचा धोका कमी आहे.

अमेरिकेत केलेल्या एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की. स्पर्श केल्यास कोविड-19 संसर्ग होण्याची शक्‍यता कमी आहे. स्पर्श करुनही संसर्ग होण्याची शक्‍यता 10 हजार लोकांपैकी एकालाच आहे.

सीडीसीने कोणत्याही गोष्टीस स्पर्श करण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तज्ज्ञांनी गेल्या वर्षी एक सल्ला देताना सांगितले की, सार्वजनिक वाहतूक, सुपरमार्केट आणि इतर ठिकाणी कोणत्याही गोष्टीला स्पर्श करु नका. जरी आपल्याला स्पर्श करावा लागला तरी ताबडतोब हात स्वच्छ करा. नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की वस्तूंना स्पर्श करण्याचा धोका कमी आहे.

सीडीसीच्या म्हणण्यानुसार, आता बंद ठिकाणी, गर्दी असलेल्या आणि हवेशीर ठिकाणी असणाऱ्या संक्रमित लोक जास्त असल्यास इतर लोकांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही जास्त असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.