पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 54 बाधितांचा मृत्यू

2710 नवीन रुग्णांची नोंद : 2872 जणांना डिस्चार्ज

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाचा हाहाकार सुरुच आहे. आणखी 54 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन 2710 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 77 हजार 934 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत शहरात 3297 जणांचा मृत्यू झाला आहे.

पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी (दि. 16) शहरात 2710 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 181 जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरातील 1 लाख 77 हजार 934 जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच आज आणखी 54 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 32 तर शहराबाहेरील 22 जणांचा समावेश आहे.

शहरातील सांगवी, काळेवाडी, रुपीनगर, चिंचवड, पिंपळे गुरव, मोशी, चिखली, भोसरी, संत तुकारामनगर, आकुर्डी, पिंपरी, मोरवाडी, निगडी येथील 32 जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील हडपसर, पिसोळी, खेड, कुरुळी, लोहगाव, धानोरी, बालेवशाडी, कोंढवा, पुणे, तळेगाव ढमढेरे येथील 22 जणांचा मृत्यू झाला.

आज दिवसभरामध्ये 2872 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 77 हजार 934 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 11,804 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 7860 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 7022 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 14,985 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 22,007 इतकी आहे. तसेच आज दिवसभरात 9081 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत 2 लाख 24 हजार 85 जणांना लस देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.