पुणे – इंडिगो एअरलाइन्सने पुणे-राजकोट आणि पुणे-वडोदरा या दोन मार्गावर विमानसेवा सुरू केल्या आहेत. तर, पुणे-जोधपूर विमानसेवेची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये गतिशीलता, सुलभता आणि आंतरराज्यीय कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे उद्दिष्ट आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या नेटवर्क जोडण्यांचा उद्देश देशांतर्गत कनेक्टिव्हिटी मजबूत करणे आणि ग्राहकांना प्रदान करणे आहे, असे इंडिगो कंपनीने म्हटले आहे.
तर, याबाबत कंपनीचे ग्लोबल सेल्स हेड विनय मल्होत्रा म्हणाले, “हवाई वाहतूक वेगाने वाढत आहे. हा प्रवास अधिक सुलभ होत आहे. आता देशांतर्गत वरील नव्या मार्गांवर विमानसेवा सुरू झाल्याने उद्योग, व्यवसाय यांसह कला-सांस्कृतिक क्षेत्रासाठी नव्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्याचा प्रवाशांना फायदा होईल.”