मुंबई – अभिनेत्री काजोल ही हिंदी चित्रपटसृष्टीतील निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या दमदार अभिनय आणि स्पष्टवक्ते वृत्तीसाठी देखील ओळखली जाते. काजोल नेहमीच आपला मुद्दा उघडे ठेवते. पण यावेळी, काजोलने तिच्या एका वक्तव्यात देशातील नेत्यांना अशिक्षित म्हटले आहे, ज्यावरून एकच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडिया यूजर्स काजोलला तिच्या व्हायरल कमेंटमुळे आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या ट्रोलिंगवर आता काजोलने सडेतोड उत्तर दिले आहे.
दरम्यान, काजोल लवकरच ‘द ट्रायल’ या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करणार आहे. वेब सीरिजची अभिनेत्री सध्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने देशातील नेत्यांचे शिक्षण आणि स्लो ग्रोथ यावर भाष्य केले, ज्यावर लोक संतापले आहेत.
काजोल म्हणाली,’स्लो ग्रोथ आहे, विशेषत: भारतासारख्या देशात… हे खूप मंद आहे कारण, आपण आपल्या परंपरा आणि कल्पनांमध्ये मग्न आहोत आणि अर्थातच त्याचा संबंध शिक्षणाशी आहे.’ ती पुढे म्हणाली,’तुमच्याकडे असे राजकीय नेते आहेत, ज्यांची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मला माफ करा, पण मी बाहेर जाऊन सांगणार आहे. देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. यातील अनेक नेते असे आहेत की त्यांच्याकडे योग्य दृष्टीकोनही नाही, जो केवळ शिक्षणातून येतो.’
नेत्यांच्या शिक्षणावर काजोलचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या काजोलला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काजोलला ट्रोल करताना एका यूजरने लिहिले,’प्रिय काजोल, विशिष्ट टोनमध्ये इंग्रजी बोलणे म्हणजे शिक्षण नाही. हे एक कौशल्य असू शकते.’ या ट्रोलिंगवर काजोलने ट्विट करत उत्तर दिल आहे.
काजोल म्हणाली,’मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व याबद्दल एक मुद्दा मांडला. माझा हेतू कोणत्याही राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा नव्हता, आपल्याकडे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर नेत आहेत.’ असं म्हणत तिने आपली भूमिका मांडली आहे.