अहमदाबाद: गुजरातमध्ये करोनाने थैमान घातले आहे. तेथील करोनाग्रस्तांचा मृत्यूदर राष्ट्रीय मृत्यूदरापेक्षा दुप्पट झाला आहे. या स्थितीमुळे करोनावर नियंत्रण आणण्यासाठी गुजरात सरकारने डॉक्टरांची एक नवीन समिती स्थापन केली असून ही समिती गुजरात व अहमदाबादमधील करोना कसा नियंत्रित करायचा याचे सरकारला मार्गदर्शन करणार आहे.
करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत हे राज्य देशात आता चौथ्या क्रमाकांचे राज्य झाले आहे. गुजरातमधील एकूण आरोग्य स्थिती आणि अहमदाबादमधील करोना हाताळण्यात सरकारी रुग्णालयांना आलेले अपयश या संबंधात हायकोर्टानेही ताशेरे मारले आहेत.
यार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही समिती स्थापन केली आहे. आरोग्य सुविधांमध्ये काय सुधारणा करायच्या, करोना नियंत्रणाबाबतीत सुरक्षेचे उपाय कोणते करायचे आणि करोनाग्रस्तांना काय उ पापचार व सुविधा द्यायच्या वगैरे बाबतीत ही समिती राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे. या समितीत आठ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.