राजेंद्र वाघमारे
नेवासा – तब्बल ४५ वर्षांच्या कालावधीतील सर्वच निवडणूका माजी खासदार यशवंतराव गडाख व लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पाडण्याची परंपरा कायम राखत नेवासा तालुका खरेदी-विक्री संघाने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचे खरेदी-विक्री संघावरील वर्चस्व या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नेवासा तालुका खरेदी-विक्री संघावर स्थापनेपासूनच माजी खासदार यशवंतराव गडाख व लोकनेते स्व.मारुतराव घुले – पाटील समर्थकांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. १९७७ पासून आजतागायत या संस्थेची एकदाही प्रत्यक्षात निवडणूक झालेली नसून सर्वच निवडणूका बिनविरोध झालेल्या आहेत.प्रामुख्याने शेतकऱ्यांशी निगडीत व्यवहार संघामार्फत केला जातो तसेच शेतकऱ्यांना खते,बी-बियाणे वाटपाचे चोख नियोजनही केले जाते सभासदांनी गडाख-घुले यांच्या नेतृत्वावर कायमच विश्वास टाकलेला आहे. आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखालील विविध संस्थांना राजकीय हेतूने लक्ष्य करुन त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असतानांच नेवासा तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक होऊ घातल्याने विरोधकांच्या भुमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
नेवासा तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभासदांनी विरोधकांची डाळ शिजू दिली नाही नेवासा तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या १७ जागांवर कैलास बाळकृष्ण काळे (धनगरवाडी), प्रभाकर राजधर कोलते (शहापूर), विजय देवीचंद चरवंडे (मुरमे), सोपान जनार्दन चौधरी (रांजणगांवदेवी), मच्छिंद्र शंकर कडू (नेवासा), युवराज माणिकराव तनपुरे (भालगांव), निवृत्ती भानुदास थोपटे (खडका), सुभाष शंकर चव्हाण (बऱ्हाणपूर), बादशहा बु-हानभाई इनामदार (खेडले परमानंद), रविंद्र शरद मारकळी (नेवासा बुद्रुक), संतोष मूळचंद फिरोदिया (प्रवरासंगम), रमेश विश्वनाथ गोर्डे (भेडा बुद्रुक),सौ शुभांगी महेश देशमुख (कुकाणा), सौ सुशिलाबाई दत्तात्रय शेटे (नेवासा खुर्द),दिपक साहेबराव चौधरी (खुपटी),जनार्दन पिराजी पिटेकर (उस्थळ दुमाला),राजेंद्र रामकृष्ण पोतदार (नेवासा) यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अर्ज माघारी घेतलेल्या सर्व उमेदवारांचे बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी आभार मानले आहेत.नवनिर्वाचित संचालकांचे ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील,आमदार शंकरराव गडाख,माजी आमदार चंद्रशेखर घुले – पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खरेदी विक्री संघाच्या सर्व सभासदांनी निवडणूक बिनविरोध केली आहे.