Kareena kapoor : अभिनेत्री करीना कपूरला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. नुकतीच ती पापाराझी यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी तिच्यासोबत तिची दोन मुलं देखील होती. मात्र तिचा छोटा मुलगा जेहचं वागणं नेटकऱ्यांना पटलं नाही. त्यावरून नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये करीना तिच्या दोन्ही मुलांसोबत कारमधून उतरताना दिसते. एका बाजूने करीना आणि तिचा छोटा मुलगा बाहेर येतो. तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या मागून तैमुर जात असतो. मात्र यावेळी चिडलेला जेह त्याच्या हातात असलेला एक कागदाचा बोळा जमिनीवर रागाने फेकून देतो आणि तो बोळा न उचलताच तो तसाच पुढे निघून जातो. हे सगळं करीना पाहत असते मात्र ती त्याला काहीच बोलत नाही. त्याची ही कृती अनेकांच्या पसंतीस न पडल्याने मुलांना शिस्त शिकवण्यावरून नेटकऱ्यांनी करीनावर टीका केली आहे.
View this post on Instagram
काही लोकांचे म्हणणे आहे की, करिनाने आपल्या मुलांना शिस्त शिकवण्याची गरज आहे. तर काहींनी करिनाचे समर्थन केले आहे. ‘लहान मुले त्यांच्या मुडप्रमाणे वागतात त्यामुळे त्यांना जज करू नये,’ असेही म्हंटले आहे. दरम्यान, करीना आणि सैफ अली खान यांना दोन मुले आहेत. करीनाच्या मोठ्या मुलाचे नाव तैमुर तर छोट्या मुलाचं नाव जेह आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, करीना कपूर खान शेवटची सुजॉय घोष जाने जानमध्ये दिसली होती. लवकरच ती ‘द क्रू’ आणि ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात झळणार आहे.