टीव्हीवरील लोकप्रिय “भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील अनिता भाभीने शो सोडला असल्याने अद्याप कोणतीही नवीन अभिनेत्री शोमध्ये दिसली नाही. आता या मालिकेत नेहा पेंडसे ही अनिता भाभीची भूमिका साकारणार असल्याचे समजते. मात्र, नेहाने याबाबत अद्याप दुजोरा दिलेला नाही.
नेहा म्हणाली, मला अद्याप “भाभीजी घर पर है’च्या निर्मात्यांकडून कोणताही फोन आला नाही किंवा मला या मालिकेसाठी संपर्क साधला गेला नाही. ही बातमी पूर्णपणे असत्य आहे.
View this post on Instagram
To somber evenings 🌧 🌧 .. hope everyone is home and safe 🤗 Wearing @shopmulmul
मला “भाभीजी घर पर है’मध्ये सौम्या टंडनच्या जागी रिप्लेस करण्यात येणार नाही. यापूर्वी “मे आय कम इन मॅडम’ या शोमध्ये संजना हितेशीच्या भूमिकेत नेहा झळकली होती. यानंतर, ती 2018मध्ये “बिग बॉस शो’मध्ये दिसली.
दरम्यान, नेहाच्या आधी शेफाली जरीवाला हिचेही नाव या भूमिकेसाठी चर्चेत होते. मात्र, या शोसाठी तिला कोणतीही ऑफर मिळालेली नाही, असे शेफालीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, “भाभीजी घर पर है’ या मालिकेतील अनिता भाभीची भूमिका कोण साकारणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.