Neha Kakkar :अभिनेत्री नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. येथील तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी नेहाने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे. तिच्या चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.
मालदिवमध्ये निळ्याशार समुद्र किनारी नेहा कक्करने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. यावेळी तिने राखाडी रंगाची मोनोकिनी घातली आहे आणि त्यासोबत तिने फ्लोरल श्रग देखील कॅरी केला आहे. जो त्याने बेल्टने सेट केला आहे. या लुकमध्ये ती बोल्ड आणि हॉट दिसत आहे. ‘A Day In The Maldives Waters’ असे कॅप्शन नेहाने या फोटोंना दिले आहे.
View this post on Instagram
तर नेहाच्या या बोल्ड फोटोशूटवर पती रोहनप्रीतने ‘Ufff!!’ अशी कमेंट केली आहे. नेहा कक्करचा हा लुक अनेकांना खूप आवडला असतानाच अनेक जण नेहाला प्रचंड ट्रोल करत आहेत. “तुम्ही असे कपडे घालू नका”, “हा लूक तुम्हाला शोभत नाही,” अशा कमेंट नेटकऱ्यांनी नेहाच्या फोटोला केल्या आहेत.
दरम्यान, नेहा कक्कर हे सध्या भारतीय संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. नेहाने फार कमी वेळात आपल्या कामाच्या जोरावर चांगले यश मिळवले आहे. नेहाची गाणी बॉलीवूडच्या टॉप लिस्टमध्ये आहेत. नेहा केवळ तिच्या मधुर आवाजामुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.