नवी दिल्ली : टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर सध्या बक्षिसांची बरसात होत आहे. अनेक राज्यांकडून खेळाडूंना विविध पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. भारत सरकारने देखील पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान केला आहे. मात्र भालाफेक क्रीडा प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचा एथलॅटीक्स फेडरेशन ऑफ इंडीयाकडून अनोखा सन्मान करण्यात येणार आहे.
नीरजने मिळवलेलं सुवर्णपदक ऍथलेटीक्समधील पहिलंवहिलं पदक आहे. त्याने ७ ऑगस्टरोजी सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानिमित्ताने एथलॅटीक्स फेडरेशन ऑफ इंडीयाने 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे घोषित केले आहे.
नीरजने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत शानदार कामगिरी करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तीत सुवर्णपदक मिळवणारा नीरज दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी नेमबाजीत 10 मीटर एअप रायपल प्रकारात 2008 मध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक पटकावले होते. भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा नीराज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.