मुंबई – हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून जेलवारी करावी लागलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे आज अमरावतीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. या वेळी राणा दाम्पत्याचा मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक करण्यात आला. यातच काल नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झालाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हनुमान चालिसा पठण करणार आहोत.’ असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केली.
त्यांच्या या टीकेवर आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिउत्तर दिल आहे. माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाला,’नवनीत राणा या अभिनेत्री आहेत. त्या चांगला अभिनय करतात आणि सध्या त्या तेच करत आहेत. कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात. आपण कोण आहोत, काय आहोत याचा विचार न करता कोणीही फडतूस माणसे अशाप्रकारचे विचार मांडत असतील, तर त्याचा विचार करायला हवा. त्या खासदार आहेत. जनतेचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा सोडून अशाप्रकारची बेफाम वक्तव्ये करू शकतात, त्या अभिनेत्री आहेत. त्यांना राजकारणाचा सिनेमा करायचा आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी राणांवर केली.
दरम्यन, राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झाला. तब्बल 36 दिवसांच्या नंतर राणा दाम्पत्य हे अमरावतीमध्ये आले. त्यांचे आई-वडील आणि नातेवाईक त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याचे विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा हार घातला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं विघ्न असून ते दूर व्हावं म्हणून आम्ही संकटमोचन हनुमानाकडे प्रार्थना करत आहोत, अशी टीका 36 दिवसानंतर विदर्भात परतलेल्या खासदार नवनीत राणा यांनी केली.