मुंबई – सध्या अभिनेता सलमान खान आपल्या आगामी सिनेमा ‘भारत‘च्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी हजेरी लावत आहे. दरम्यान, प्रमोशनच्या वेळी सलमानने मीडियासह सवांद साधला. या संवादामध्ये सलमानला अभिनयक्षेत्रा बद्दल काही प्रश्न देखील विचारण्यात आले. ‘सध्याची नवीन पिढी ही भूमिकेला आणि विषयाला महत्व देऊन आपली प्रसिद्धी मिळवू पाहते आहे का? असा प्रश्न सलमानला यावेळी विचारण्यात आला.
यावर सलमाने सांगितले कि, प्रसिद्धी ही नेहमीच कमी होत जाते आणि ती टीकवून ठेवण्यासाठी खूप देखील मेहनत घ्यावी लागते. मला, बॉलिवूड मधील असे काही सुपरस्टार सुद्धा माहित आहेत ज्यांच्या चित्रपटांनी काही कालावधीनंतर बॉक्स ऑफिसवर फक्त १०ते १५ % कमाई केली आहे. आणि तसे पहिला गेले तर, काही दिवसांनंतर हे आमच्यासोबतही होणार आहे. पण मला असे वाटते की ते अद्याप सुरू देखील झाले आहे. असे उत्तर सलमानने दिले. ‘भारत’ सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर निर्मिती अतुल अग्निहोत्री करत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खानचा हाही चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.