पुणे -वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली “नीट पीजी’ दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
“नीट’ची तारीख सोमवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या “नीट पीजी’च्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.