इस्लामाबाद : पाकिस्तानची मॉडेल आणि अभिनेत्री नायब नदीम लाहोरमधील डिफेन्स एरियात आपल्या घरात मृतावस्थेत सापडली. एक्सप्रेस ट्रिब्यूनके दिलेल्या वृत्तानुसार, 29 वर्षीय नदीमची डीएचए फेज-5 मधील तिच्या घरात अज्ञात व्यक्तींनी गळा आवळून हत्या केली. नदीमच्या शरीरावर आणि मानेवर काही निशाण सापडले आहेत. त्यामुळे हत्येपूर्वी पीडितेवर बलात्कार झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
डिफेन्स बी स्टेशनचे पोलीस अधिकारी नय्यर निसार म्हणाले, पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचं खरं कारण समजू शकेल. पोलिसांनी पीडित नदीमचा सावत्र भाऊ नासिरच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केलाय. नासिरने सांगितलं की तो जेव्हा बहिणीला भेटायला पोहचला तेव्हा ती फरशीवर नग्न (विवस्त्र) अवस्थेत पडलेली दिसली.
नासिरने बहिण नदीमला फोन केला, मात्र तिने उचलला नाही. त्यामुळे तो नदीमला भेटण्यासाठी घरी आला. घरी दरवाजाच्या बेल वाजवूनही दरवाजा उघडला नाही. विशेष म्हणजे त्यावेळी नदीमची कार घराबाहेरच उभी होती. त्यामुळे नासिरने प्रयत्नपूर्वक दरवाजा उघडून आत पाहिलं तर त्याला नदीमचा नग्न मृतदेह फरशीवर पडलेला दिसला.
नदीच्या घराच्या बाथरुमची खिडकी तुटलेली आढळली. त्यामुळे हत्येनंतर आरोपी या खिडकीतूनच फरार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मॉडेल नायब नदीम घरात एकटीच राहायची. तिचं लग्न झालेलं नव्हतं. नासिरने सांगितलं, मी नदीमची चौकशी करण्यासाठी नेहमी यायचो. तिला घरातील गरजेच्या वस्तू आणून द्यायचो.