#Video : वडोदरामध्ये नागरीवस्तीत शिरलेल्या मगरीला ‘एनडीआरफ’कडून जीवदान

वडोदरा – गुजरात राज्यातील वडोदरा शहरातील वडसरमध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचा फटका वन्यप्राण्यांनादेखील बसला आहे.

नद्यांना पूर आल्यामुळे वडोदरा शहरात वडसरमध्ये एक मगर नागरी वस्तीत घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत एनडीआरएफ टीमला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यानंतर एनडीआरएफ टीमने मगरीला पकडत तिला सुखरूप पणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे.

वन्यजीव आणि पर्यावरणाविषयी संवेदनशीलता दाखवत आपली कामगिरी बजावल्याने एनडीआरफच्या टीमचे सर्वत्र कौतूक होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.