शेवगाव – तालुक्याच्या बोधेगावसह अनेक गावांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे व काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, त्यांना भरपाई मिळावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार छगन वाघ यांना दिले. याबाबत तातडीने कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी जाहीर करण्यात आला.
या वेळी राजेंद्र दौंड, रामजी अंधारे, एकनाथ कसाळ, संतोष पावसे, नानासाहेब मडके, ताहेर पटेल, हनुमान पातकळ, मनोज तिवारी, समीर शेख, मोहित पारनेरे, जाकीर कुरेशी, अभिजित आहेर, अभिषेक पवार, मंगेश थोरात, प्रदीप काळे, अश्पाक पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.