शरद पवार राजकारणातले ‘भिष्म पीतामह’ – संजय राऊत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सक्तवसुली संचलनालयात (ईडी) दुपारी 2 वाजता उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सध्या राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत.  दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिले आहे. शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत म्हणाले की, “संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचे नाव घेतले नसल्याचे म्हटले आहे. अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे”. शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि कृषी क्षेत्रात खूप काम केले आहे. शरद पवार यांचा पक्ष आणि विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. पण ईडीने त्यांच्यासोबत चुकीचे केले आहे असंच मी म्हणेन. या घोटाळ्यावरुन विधानसभेत चर्चा झाली होती तेव्हा त्यांचं नाव नव्हतं. ईडी आज देवापेक्षाही मोठी झाल आहे ? देव माफ करु शकतो, पण ईडी नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.