पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जमलेली गर्दी पक्षाच्या शहराध्यक्षांना चांगलीच महागात पडली. या कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली होती.
मात्र जामीन मिळताच त्यांची अवघ्या काही वेळात सुटकाही झाली. जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत जगतापांकडून दिलगिरी व्यक्त –
पुढच्या काळात नियमांची पायमल्ली करणार नाही. सर्व नियम पाळू. गर्दी जमवल्या प्रकरणी आम्ही पुणे शहराची दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.