NCP MLA Disqualification Case Rahul Narvekar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता. आज 15 फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निकाल जाहीर केला. अजित पवार गट हीच मूळ राष्ट्रवादी असल्याचे यावेळी नार्वेकरांनी जाहीर केले.
राहुल नार्वेकरांच्या निकालातील महत्वाचे मुद्दे
- विधिमंडळाच्या बहुमतवर पक्ष ठरणार
- दोन्ही गटांनी पक्षाच्या घटनेनुसार नेतृत्व निवडण्याचा दावा केला आहे.
- प्रतिनिधी निवडल्याचे शरद पवार गटाचे पुरावे नाहीत.. राष्ट्रीय कार्यकारणीत पवार गटाला बहुमत स्वीकारले जाऊ शकत नाही.
- मूळ पक्ष आम्हीच असा दावा दोन्ही गटांनी केला आहे.
- अजित पवार गटाला शरद पवार गटापेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा
- विधिमंडळाचे बहुमत देखील अजित पवारांच्या बाजूने आहे.
- अजित पवार गटाचे बहुमत हे निर्विवाद आहे.
- अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी आहे.
- शरद पवार गटाचे आमदारही पात्र करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले होते. या दोन्ही गटांनी एकमेकांच्या समर्थक आमदारांविरोधात विधानसभा अध्यक्षाकडे अपात्रतेचे दावे दाखल केले होते. यावर अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल जाहीर केला आहे. | NCP MLA Disqualification Case Rahul Narvekar
निवडणूक आयोगाने दिला होता हा निकाल
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने तब्बल 10 हून अधिक सुनावणी घेतल्या होत्या. त्यानंतर अखेर सहा फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने याबाबत निकाल दिला होता. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाले. त्यामुले अजित पवार यांच्याकडंच राष्ट्रवादीची मालकी राहणार असल्याचं स्पष्ट झाले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेची उद्दिष्टे तपासून हा निर्णय दिले. | NCP MLA Disqualification Case Rahul Narvekar