मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. संघाकडून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्याने त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंची फिरकी घेतली आहे. त्यानं इ ट्विट केले आहे की, “कृपया पत्रकार बांधवांनी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी!!” असं कॅप्शन देत मोहन भागवत यांना कोरोना झाल्याच्या बातमीला शेअर केली आहे.
दरम्यान, करोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आज येथे केले आहे. सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादंगाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या याच विधानावरून सध्या सोशल माध्यमांतून त्यांच्यावरटीका केली जात आहे.