मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जामीनाची प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे. नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने ( गेल्या आठवड्यात मान्य केलीये. या जामिनाची प्रक्रिया आज मुंबई सत्र न्यायालयात पूर्ण केली जणार आहे.
विशेष न्यायालयाने रिलीज ऑर्डर दिल्यानंतर नवाब मलिकांच्या सुटकेचे आदेश जारी होणर आहेत. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले नवाब मलिक हे गेल्या वर्षभरापासून कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार घेत आहेत.
गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती.नवाब मलिकांना 11 ऑगस्टला जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेनेतील फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली. अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडत भाजप आणि शिंदे गट यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले. एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट. अशातच आता नवाब मलिकांना जामीन मिळाल्यानंतर ते कोणाची साथ देणार? हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.