राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पडळकर यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यांमधून त्यांच्या निषेधार्थ पडळकर यांच्याप्रतिमेला जोडे मारो आंदोलनाबरोबरच त्यांच्या प्रतिमेचे आणि पुतळ्याचे दहनही करण्यात आले आहे. काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला काळे फासून तालुक्यात येण्यास बंदीही करण्यात आली असल्याचे कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.
बेलवाडीत पुतळा जाळला
भवानीनगर -बेलवाडी येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी बारामती लोकसभा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. शुभम निंबाळकर, तालुका उपाध्यक्ष ओंकार जामदार, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत निंबाळकर, करण काटे, विश्वजीत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार, विक्रम जामदार, पवन जामदार, अभि यादव, जोतिराम जामदार, पप्पु भगत, पप्पू सावंत, परशुराम सावंत, सौरभ कदम, सूरज कदम, गणेश निकम, सागर पवार, सूरज पवार, जावेद शेख, अक्षय कदम, वैभव जामदार, विराज जामदार, संकेत पवार, सुरज कदम, धीरज निंबाळकर, सिद्धू जामदार, सौरभ कदम, ऋषी जामदार, विवेक डोईफोडे, राहुल जाधव, कपिल जामदार, किरण जाधव, विकास शेगर, आदी उपस्थित होते.