पुणे : कोरोनाची साथ रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे दररोज मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे बाणेर मध्ये अशा मजुरांच्या कुटुंबाना धान्य तसेच अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष महेश हांडे, उपाध्यक्ष महादेव चाकणकर , आकाश तापकीर , अक्षय चाकणकर ,सागर म्हेत्रे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात वेगवेगळ्या भागात अशी शेकडो कुटुंब असून त्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यानंतर पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं इतर गरजूसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे हांडे यांनी सांगितले.