मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीकडून रियाची चौकशी सुरू होती. त्यानंतर एनसीबीने रियावर अटकेची कारवाई केली.
यातच,इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीने केलेल्या कारवाईपूर्वी झालेल्या चौकशीमध्ये रियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला होती.
दरम्यान, आता या प्रकरणात बॉलिवूडमधील टॉप पाच कलाकारांची नावं कथित स्वरुपात समोर आली आहेत. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) चौकशी करीत असलेल्या या ड्रग संदर्भातील चॅटिंगमधून बॉलिवूडमधील पाच टॉपच्या कलाकारांच्या नावांची अद्याक्षरं समोर आली आहेत. यामध्ये K, D, S, N आणि J ही अद्याक्षरं आहेत. यामध्ये ‘K’ हा ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार, ‘D’ हा टॉप कलाकार जो करन जोहरच्या पार्टीतील व्हिडिओत दिसला होता. ‘S’ म्हणजे अभिनेत्री श्रद्ध कपूर, ‘N’ हा ९०च्या दशकातील अभिनेता. ‘J’ म्हणजे जया शाह ही नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, याच प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत कौर यांना या आठवड्यात चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात बोलावलं जाऊ शकतं.