Entertainment : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराने (Nayantara) बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण केले. मात्र सध्या नयनतारा तिच्या चित्रपटामुळे नाही, तर तिच्या जुळ्या मुलांमुळे चर्चेत आली आहे. नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन 26 सप्टेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांचे पालक झाले. आता त्यांनी आपल्या या चिमुकल्यांच्या पहिला वाढदिवस साजरा केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच मुलांचा चेहरा दाखवला आहे.
नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या मुलांची नवे उईर आणि उलाग असे आहे. 26 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर त्यांचे फोटो शेअर करत नयनतारा आणि विघ्नेश यांनी पोस्ट मध्ये लिहिले की, ‘आम्ही आमच्या लाडक्या मुलांची छायाचित्रे पोस्ट करण्यासाठी बराच वेळ वाट पाहिली. प्रिय उईर रुद्र नील आणि उलग दैविक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. अप्पा आणि अम्मा तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतात. आमच्या आयुष्यात आल्याबद्दल आणि ते सुंदर बनवल्याबद्दल धन्यवाद.
View this post on Instagram
पुढे त्यांनी लिहिले की, ‘तुम्ही आमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि भरपूर आशीर्वाद आणले आहेत. हे संपूर्ण वर्ष आपल्या नेहमी स्मरणात राहणार्या सुंदर आठवणी आणि खास क्षणांनी भरले आहे. तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम. तुम्ही आमचे जग आहात आणि आमचे जीवन धन्य झाले आहे.’
View this post on Instagram
या चित्रांमध्ये उईर आणि उलाग खूप गोंडस दिसत आहेत आणि चाहते खूप प्रेम आणि आशीर्वाद देत आहेत. एका स्विमिंग पुलच्या बाजूला क्लिक केलेल्या या फोटोंमध्ये नयनतारा आणि विघ्नेश आपल्या मुलांना घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नयनतारा आणि विघ्नेश यांचे जून 2022 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांतच अभिनेत्रीने सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली.