मुंबई – दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नयनताराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेता शाहरुख खानसोबत ती ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे. 7 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वी नयनताराचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिला ओळखणेही कठीण झाले आहे. यावरून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
नयनताराचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावरून तिच्यावर टीका केली जात आहे. तिचा हा फोटो पाहून अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे हा प्रकार घडल्याचे लोकांचे म्हणणे आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘या फोटोंमध्ये नयनतारा पूर्णपणे वेगळी दिसत आहे. तिच्या सर्जनने जादू केली आहे. दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘प्लास्टिक सर्जनला पुरस्कार द्याला हवा.’ त्यानंतर आता नयनताराचे जुने आणि आताचे फोटो शेअर केले जाऊ लागले आहेत.
दरम्यान, नयनताराने जवान चित्रपटासाठी तगडी फिस घेतली असल्याचे म्हंटले जात आहे. नयनतारा ही साऊथची एकमेव महागडी अभिनेत्री ठरली आहे. तिने तब्बल 11 कोटी रूपये मानधन चित्रपटासाठी घेतले आहे. साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमराच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे बजेट सुमारे 300 कोटी असून हा शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.