बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी “सीरियस मॅन’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. यात नवाजुद्दीन हा एका सर्वसामान्य नागरिकाची भूमिका साकारत आहे. ज्याचा मुलगा खूपच हुशार असतो. हा ट्रेलर पाहिल्यानंतर असे वाटते की, हा चित्रपट एज्युकेशन सिस्टमवर आधारित असून आई-वडील हे आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी किती गंभीर असतात. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हा अयान मणि नामक व्यक्तीची भूमिका साकारत आहे. जो एक मध्यमवर्गीय असून तो आपल्या मुलाला एक “सीरियस मॅन’ बनवू इच्छितो. हा चित्रपट मनु जोसेफ यांच्या पुस्तकावर आधारित आहे. दरम्यान, ट्रेलरच्या सुरुवातीलाच नेपोटिझमवर फटकार लगाविण्यात आली असून यात चार पिढींमधील बदल दाखविण्यात आला आहे.
View this post on Instagram
Happiest Birthday to the Crazy Kudi @athiyashetty May your life be as sweet as Motichoor 😄😄😄
“सीरियस मॅन’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, इंदिरा तिवारी, एम. नस्सार आणि अकाशथ दास यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यंनी केले असून हा चित्रपट 2 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे.