बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह याने लॉकडाऊननंतर दीर्घ काळानंतर कामावर वापसी केली आहे. त्याने आपल्या आगामी “जयेशभाई जोरदार’चे डबिंग सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याला यशराज फिल्म्स स्टूडियोजवळ स्पॉट करण्यात आले होते. या चित्रपटाचे शूटिंग त्याने यावर्षीच्या प्रारंभीला सुरू केले होते.
रणवीरने पुन्हा चित्रपटाच्या डबिंगचे कामास सुरुवात केली आहे. त्याचे वर्क शेड्यूल पूर्वीप्रमाणेच सामान्य आहे. “जयेशभाई’चे काम अंतिम टप्प्यात असून हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदिर्शत होणार असल्याचे समजते. सध्या रणवीरसिंह चाहत्यांनाही सिनेमागृह कधी खुले होतील याची प्रतीक्षा आहे.
View this post on Instagram
I gotta take it on the other side 🎵 🎶 what’s your favourite @chilipeppers track ? 🌶
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणवीर सिंह “सूर्यवंशी’मध्येही झळकणार आहे. यात त्याच्यासोबत अक्षय कुमार, अजय देवगण आणि कतरिना कैफ मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय त्याचा स्पोर्टस ड्रामा “83′ हा चित्रपटाही प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.
यात तो दीपिका पादुकोणसोबत पुन्हा एकदा स्क्रीनशेअर करत आहे. या मल्टीस्टार चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे.