वॉशिंग्टन – अमेरिकेचे लोकप्रिय सोशल मीडिया अॅप टीक-टॉक आणि वी-चॅटवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत अमेरिकेने या चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
माहितीनुसार, २० सप्टेंबरपासून वी-चॅट आणि १२ नोव्हेंबरपासून टीक-टॉकवर अमेरिकेत निर्बंध असणार आहेत. मागील महिन्यातच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी टीक-टॉक आणि वी-चॅटवर बंदी घालण्याच्या आदेशावर सही केली होती. याअंतर्गत दोन्ही कंपन्या त्यांची मालकी अमेरिकन कंपन्यांना विकू शकतात. मात्र टीक-टॉकने मायक्रोसॉफ्टला विक्री करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
अमेरिकेचे व्यापार मंत्री विल्बर रॉस यांनी म्हंटले कि, चीनच्या अॅप्सने अमेरिकी नागरिकांची व्यक्तिगत माहिती चोरली असल्याने ट्रम्प यांच्या निर्देशानुसार त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर टिकटॉकमध्ये काही सुरक्षा उपाययोजना केल्या गेल्या तर त्याचा वापर शक्य आहे अन्यथा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच वाणिज्य विभागाने अन्य सोशल मीडिया अॅप्सना देखील व्हीचॅट आणि टीक-टॉकच्या बेकायदेशीर वर्तनाची कॉपी करण्यावरून इशारा दिला आहे. दरम्यान, भारताने याआधीच टीक-टॉकवर बंदी घातली आहे.