बॅंकॉक – थायलंडच्या आखातात एक युद्धनौका बुडाल्यानंतर 31 खलाशी बेपत्ता झाले आहेत. (31 missing as Thai navy ship sinks in Gulf of Thailand) समुद्र खवळलेला असल्यामुळे ही युद्धनौका बुडाल्याचे सांगण्यात येते आहे. “एचटीएमएस सुखोताई’ या जहाजावरील बेपत्ता खलाशांच्या शोधासाठी थायलंडच्या नौदलाचे जहाज आणि हेलिकॉप्टरकडून अव्याहतपणे शोध सुरू आहे.
आतापर्यंत 75 खलाशांना सुखरुप सोडवण्यात यश आले आहे. मात्र अजूनही 31 जण बेपत्ता आहेत, असे थायलंडच्या नौदलाकडून सांगण्यात आले.
रविवारी रात्री ही दुर्घटना घडली तेंव्हा समुद्र खवळलेला होता. त्यामुळे मदत आणि बचावकार्य तात्काळ सुरू केला जाऊ शकले नव्हते. समुद्रातील लाटा अजूनही उंच उसळत आहेत. त्यामुळे लहान बोटींच्या मदतीने मदत आणि बचावकार्य केले जाऊ शकत नसल्याचे थायलंडच्या नौदलाने म्हटले आहे.
Karnataka Politics : कर्नाटक विधानसभेत वीर सावरकरांचा फोटो लावल्यावरुन वाद
उंच उसळणाऱ्या लाटांमुळे या युद्धनौकेवरील इलेक्ट्रीक यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे या युद्धनौकेला नियंत्रित केले जाणे अवघड झाले होते. 3 मीटरपेक्षा अधिक उंच लाटेमुळे ही युद्धनौका उलटली आणि बुडाली, असे वाचवण्यात आलेल्या एका खलासाने सांगितले. मासेमारी करणाऱ्या नौकांच्या मदतीसाठी नियमित गस्तीवर असताना ही युद्धनौका दुर्घटनाग्रस्त झाली होती.