बीजिंग – आधुनिक काळात कोणत्याही देशाला युद्ध नको असले तरी युद्धासाठी सर्वांची तयारी मात्र असतेच आणि यामध्ये नेहमीच चीनची आघाडी असते. आता नवीन माहितीप्रमाणे चीनने एका सुपर सोल्जरची निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे. कोणतीही विश्रांती किंवा झोप न घेता आणि कोणताही आहार न घेता हा सुपर सोल्जर दीर्घकाळ रणांगणात कार्यरत राहू शकणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारच्या सैनिकाची निर्मिती चीन करत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
2012 मध्ये फ्रान्समधील दोन महिला संशोधक इमॅन्युअल आणि जेनिफर यांनी क्रिस्पर नावाच्या एका तंत्रज्ञानाचा शोध लावला होता. या तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी डीएनएमध्ये आणि जनुकीय रचनेमध्ये बदल करणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला होता. याच तंत्रज्ञानाचा वापर करून चीन सुपर सोल्जरची निर्मिती करत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. जीवसृष्टीतील कोणत्याही सजीव जीवाचा पाया हा डी एन ए असतो जीन्स हा या डीएनएचाच एक भाग असतो. आता या जीन्सचे एडिटिंग करून म्हणजेच त्याच्यात बदल करून आपल्याला हवा तसा मानव निर्माण करण्याचा विचार क्रिस्पर या तंत्रज्ञानात करण्यात आला होता.
सर्वसाधारणपणे आई-वडिलांकडून कोणालाही जीन्सचे हस्तांतरण होते पण जेव्हा आई-वडिलां कडून मिळालेल्या या जीन्सचे एडिटिंग करून त्यामधील गुणधर्म बदलण्याचे काम केले जाते तेव्हा त्याला अपेक्षित अशा जीवाची निर्मिती करण्यास शक्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून चीनने आता या सुपर सोल्जरची निर्मिती सुरू केली आहे. अमेरिकेन गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चीनने 2020 पूर्वीच या तंत्रज्ञानाचा वापर करून सुपर सोल्जर निर्मितीला प्रारंभ केला आहे.
ब्रिटनच्या गुप्तचर संस्थानाही याला दुजोरा दिला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय घातक अशा सैनिकाची निर्मिती करण्याची चीनची योजना आहे. जर युद्धासारखी परिस्थिती उद्भवलीच सुपर सोल्जर अजिबात न दमता न खाता पिता आणि कोणतीही विश्रांती न घेता दीर्घकाळ रणांगणामध्ये संघर्ष करू शकतात चीनला जगातील सर्वात शक्तिशाली महासत्ता व्हायचे असून त्यासाठी सर्व सीमा ओलांडण्याची त्यांची तयारी आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे. 2018 मध्ये चीनमधील एका शास्त्रज्ञाने डिझाईनर बेबी तयार केली होती. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता चीनमधील संशोधक सुपर सोल्जरच्या निर्मितीच्या मागे लागले आहेत.