शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वडजाईनगर येथे राहणारा एकजण पत्नीला मारहाण करीत असल्याने पत्नीच्या माहेरच्या लोकांनी महिलेच्या पतीसह पतीच्या वडिलांना मारहाण केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शिक्रापूर येथील वडजाईनगर येथे दीपक बोंबले हा पत्नी दीपाली हिस वारंवार मारहाण करीत असल्याने दीपालीने तिच्या माहेरच्या लोकांना सांगितले. माहेरच्या आई वडिलांसह आदी लोकांनी येऊन बोंबले व वडील बापू बोंबले यांना मारहाण करीत जखमी केले. दीपक बापू बोंबले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी धनंजय हनुमंत जाधव, हनुमंत यशवंत जाधव, शोभा हनुमंत जाधव, सुभाष कारभारी जाधव, भूषण सुरेश जाधव, सुरेश ऊर्फ दादा यशवंत जाधव, धनंजय जाधव, बाबू मुसळे (सर्व रा. बोटा, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विवाहिता दीपाली दीपक बोंबले हिने पतीविरोधात फिर्याद दिली आहे.