Navjot Singh Sidhu is back :- पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी फक्त तीन दिवस बाकी आहेत. २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएलची सुरुवात होणार आहे. आपण आयपीएल स्पर्धेत समालोचन करणार असल्याची माहिती स्वतः सिद्धू यांनीच दिली आहे. अशा स्थितीत पंजाबमधील लोकसभा निवडणुकीत सिद्धू प्रचार करताना दिसणार नसल्याचेही सांगितले जात आहे.
स्टार स्पोर्ट्सने सिद्धू यांना आयपीएलसाठी समालोचन करण्यासाठी करारबद्ध केले आहे. २०१४ साली त्यंनी समालोचन सोडून राजकारणात प्रवेश केला होता. सध्या ते काँग्रेस पक्षाचा एक भाग आहेत.
राजकारणात आल्यानंतर सिद्धू यांनी समालोचन करणे बंद केले होते. समालोचकांच्या पथकात सिद्धू यांच्यासह हर्षा भोगले, निक नाइट, मॅथ्यू हेडन, लक्ष्मण शिवरामकृष्णन, जॅक कॅलिस, केविन पीटरसन यांचाही सहभाग आहे.