राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर

दाऊदच्या साथीदाराशी पटेल यांचा जमिन व्यवहार झाल्याचा आरोप

नवी दिल्ली : माजी नागरी उड्डयनमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कुटुंबाशी आर्थिक भागीदारी आणि जमीनशी संबंधित आर्थिक व्यवहाराची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे. पटेल यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नातेवाईक इकबाल मिर्ची याच्या कंपनीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. याच आरोपाखाली पटेल यांच्यासह कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इमब्राहीमचा साथीदार इक्‍बाल मेमन उर्फ मिर्च याच्याशी प्रफुल्ल पटेल यांनी आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने हा तपास सुरु केला आहे. पटेल यांच्या कुटुंबीयांच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीने इक्‍बाल मेमनला एक प्लॉट दिला होता. वरळीतील नेहरु तारांगण या प्राईम लोकेशन परिसरातील हा प्लॉट आहे. याच प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली सीजे हाऊस नावाची इमारत बांधली आहे.

प्लॉट रिडेव्हलपमेंटशी संबंधित पटेल यांची कंपनी आणि इक्‍बाल मेमन यांच्यामध्ये एक करार झाला. त्यानुसार इमारतीच्या बदल्यात दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आले. या दोन मजल्यांची किंमत जवळपास 200 कोटी रुपये आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीच्या भागधारक आहेत. यामुळे चौकशीसाठी पटेल कुटुंबीयांना ईडकडून बोलावले जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई आणि बंगळुरुमध्ये ईडीने छापे टाकलेल्या अनेक छाप्यांमधून याप्रकरणाची कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहेत. त्याआधारावर ईडीने ही चौकशी सुरु केली आहे. दरम्यान या प्रकरणी पटेल कुटुंबीयांनी याप्रकरणात नाव आल्याने धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.